रायबरेली दौऱ्यादरम्यान प्रियांका गांधींनी हाताळले साप

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 2 मे 2019

रायबरेली : लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात जोरदार प्रचार करत असलेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी चक्क विषारी सापांशी खेळण्याचा अनुभव घेतला. 

समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचून त्या सध्या प्रचार करत आहेत. पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी असलेल्या प्रियांका यांनी रायबरेली मतदारसंघात प्रचार करताना एका गारुड्याजवळील सापांशी खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी प्रियांका यांना साप हातात घेण्याचाही मोह आवरला नाही. प्रियांका यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

तर, दुसरीकडे अमेठीमध्ये प्रचार करत असताना मुलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मुलांनी चौकीदार चोर है, चौकीदार चोर है च्या घोषणा दिल्या. त्यानंतर काही मुलांनी अपशब्द वापरल्यानंतर प्रियांका यांनी त्यांना शांत केले व असे शब्द योग्य नसल्याचे सांगितले. मुलांचा आणि सापांबरोबर खेळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Web Title: Congress General Secretary for Uttar Pradesh Priyanka Gandhi Vadra meets snake charmers in Raebareli

संबंधित बातम्या

Saam TV Live