राफेल मुद्यावर पंतप्रधान मोदी गप्प का? राहुल गांधींचा सवाल

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 2 जानेवारी 2019

नवी दिल्ली : राफेलच्या मुद्द्यावर आज पूर्ण देश मोदींना प्रश्न विचारत आहे. मोदींनी दीड तास दिलेल्या मुलाखतीत पाच मिनिटेही राफेलवर भाष्य केले नाही. मोदींमध्ये या मुद्द्यावर संसदेत येऊन बोलण्याचे धाडस नाही आणि संरक्षणमंत्री अण्णा द्रमुकच्या खासदारांआड लपत आहेत, अशी जोरदार टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

ऑडिओ क्लिपमध्ये सत्यता आहे का? असा सवाल लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केला. त्यानंतर काँग्रेसने ही ऑडिओ क्लिपच्या सत्यतेबाबत शंका असल्याने सभागृहात सादर करता येत नसल्याचे सांगितले.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लोकसभेत बोलत होते. त्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे : 

 • मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत पाहिली. अर्धा तास त्यांचे भाषण ऐकले.
 • पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात राफेल कराराविषयी एकही शब्द उच्चारला नाही.
 • कोणत्याही करारात तीन स्तंभ आहेत. त्यामध्ये प्रक्रिया, किंमत आणि तिसरा स्तंभ पैसा.
 • राफेल विमान कराराबाबत पर्रीकरांना याबाबत माहिती होती का याबाबत विचारण्यात आले होते. मात्र, त्यांनी आपणाला कोणतीही माहिती, कल्पना नसल्याचे सांगितले.
 • 126 विमान खरेदीचा जुना करार रद्द करून 36 विमानांचा करार तयार करण्यात आला.
 • 36 विमानांबाबत त्यांनी तातडीने निर्णय घेण्याची काय गरज होती?
 • याबाबतची माहिती कोणालाही नव्हती.
 • नवा करार 526 कोटींवरून 1600 कोटींवर गेला कसा?
 • विमानांची संख्या कमी झाली कशी?
 • राफेल विमान कराराची एवढी किंमत झाली कशी?
 • 1600 कोटींचा हा करार झाला.
 • या नव्या किमतीवर आक्षेप घेण्यात आला नाही.
 • एचएएल विमान निर्माती कंपनी गेल्या 70 वर्षांपासून विमानांची निर्मिती करत आहे.
 • एचएएल कराराच्या 10 दिवसांपूर्वी अनिल अंबानी यांनी कंपनीची स्थापना केली.
 • त्यानंतर त्यांच्या कंपनीला 30,000 कोटी रुपये पंतप्रधानांनी दिले.
 • आतापर्यंत एकही राफेल विमान भारतात आले नाही.
 • राफेल विमानाच्या अचानक किमती वाढल्या कशा?
 • कराराची प्रक्रिया डावलून त्यांनी राफेल करार केला.
 • राफेल विमान करारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: संसदेत येत नाहीत ते एका रुममध्ये बसत आहे.
 • तर संरक्षणमंत्री सीतारमन अण्णा द्रमुकच्या खासदारांच्या मागे लपून बसल्या आहेत.
 • हवाई दलाच्या मागणीत कोणी बदल केला?
 • राफेल मुद्यावर पंतप्रधान मोदी गप्प का? ते बोलत का नाहीत?
 • प्रश्न विचारणं ही माझी जबाबदारी, असेही राहुल गांधी म्हणाले.

संबंधित बातम्या

Saam TV Live