राफेल विमानाची पहिली भरारी; पाकिस्तान, चीनला भरली धडकी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 12 जुलै 2019

देशभरात गाजलेल्या राफेल लढाऊ विमानानं आकाशात पहिली भरारी घेतली. भारतीय हवाई दलाचे वाईस चीफ एयर मार्शल आर के एस भदौरिया यांनी फ्रान्समध्ये राफेल विमानाची चाचणी घेतली. राफेल विमानाच्या चाचणीचा अनुभव जबरदस्त होता असं त्यांनी सांगितलं. राफेल लढाऊ विमानातली टेक्नॉलॉजी आणि हत्यांरांमुळं भारतीय वायूसेनेसाठी राफेल विमान गेम चेंजर ठरेल. त्याचप्रमाणे युद्धजन्य परिस्थितीत राफेलची भूमिका निर्णायक असेल, असा विश्वास भदौरिया यांनी व्यक्त केला. 

भारतीय हवाई दलाची राफेल आणि सुखोई लढाऊ विमानं तणावाच्या परिस्थितीत पाकिस्तानसाठीच नव्हे तर इतर कुठल्याही देशांसाठी डोकेदुखी ठरतील. 

एक नजर टाकुयात राफेलच्या वैशिष्ट्यांवर ?

  • राफेल एक असं लढाऊ विमान आहे जे एक मिनिटात 60 हजार फूट उंच झेप घेऊ शकतं.
  • राफेलची मारक क्षमता ही जवळपास 3700 किलोमीटर इतकी आहे.
  • राफेल 2200 ते 2500 किलोमीटर प्रतितास या वेगाने उडू शकतो.
  • मिटीअर मिसाईल आणि इस्त्राईल प्रणालीचा वापर करण्यात आला आहे.
     
फेब्रुवारीत पाकिस्ताननं जी आगळीक केली होती ती करण्याची हिंमत पुन्हा पाकिस्तान करणार नाही, तर फक्त पाकिस्तानच नाही तर इतर कोणताही देश भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणार नाही. भारताच्या ताफ्यातल्या सुखोई आणि राफेलच्या समावेशानं भारताची ताकद दुपटीनं वाढलीय हे नक्की.

संबंधित बातम्या

Saam TV Live