पक्ष्यांसाठी १७० वृक्षांवर दाणापाण्याची सोय

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 7 मे 2018

कायगाव - सध्या उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्याने माणसांसह पशुपक्ष्यांचे अन्नपाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. त्यात वाढती लोकसंख्या, शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि मोबाईल मनोरे रेंजच्या परिणामामुळे पक्ष्यांची संख्या घटत आहे. ती वाचावी  यासाठी सोलेगाव (ता. गंगापूर) येथील एक पन्नास वर्षीय अवलिया रघुनाथ पवार महाराज यांनी स्वतः लावलेल्या १७० वृक्षांवर मातीचे गाडगे बांधून पक्ष्यांसाठी दाणापाण्याची सोय करून माणुसकीचा धर्म जोपासला आहे. 

औरंगाबाद-नगर महामार्गापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीरामवनामध्ये मठाधिपती पवार महाराज यांनी काही वर्षांपूर्वी ओसाड शेतजमिनीवर लहान-मोठे वृक्ष लागवड करून संवर्धन केले. तेव्हापासून त्यांनी दरवर्षी वृक्ष लावण्याचा आणि लावलेले वृक्ष मोठे झाल्यावर त्यास मातीचे गाडगे बांधून पक्ष्यांसाठी दाणापाण्याची सोय करायची, हा त्यांचा नित्यक्रम बनला आहे. रोज पक्ष्यांसाठी तीन किलो तांदूळ, तर तीन किलो बाजरी, तीन किलो ज्वारी आणि ११० लिटर पाणी लागते. सकाळ - संध्याकाळ राममंदिर परिसरात भाविकांची वर्दळ असते. भाविक आणि महाराज झाडावर बांधलेल्या गाडग्यांत पाणी व धान्य टाकीत असतात.

विविध प्रजातींच्या झाडांची लागवड  
गुलाब, मोगरा, खारीक, जांब, बोर, जांभूळ, चिंच, करंजी, रामफळ, चिरी, भेंडी, वड, डाळिंब, चिकू, चिंच, शेवगा, हादगा, बेल, सुपारी, छापा, शेव झाडांच्या प्रजातींची लागवड करण्यात आली आहे. त्यांचे संगोपन करून पर्यावरण समतोल राखण्यासाठी पवार महाराजांनी पुढाकार घेतला आहे.

सध्या दुष्काळसदृश परिस्थितीत वन्यप्राणी आणि पशुपक्ष्यांचे हाल होत आहेत. त्यांच्यासाठी कृत्रिम पाणवठे तयार करणे गरजेचे आहे. तालुक्‍यातील इतर गावांच्या ग्रामस्थांनीही रघुनाथ पवार महाराजांसारखा पुढाकार घ्यावा.
- चंद्रकांत शेळके, तहसीलदार

संबंधित बातम्या

Saam TV Live