'बँक ऑफ इंग्लंड'च्या गव्हर्नर पदासाठी पुन्हा एकदा चर्चा रघुराम राजन यांच्याच नावाची 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 मे 2019

नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे नाव 'बँक ऑफ इंग्लंड'च्या गव्हर्नर पदासाठी सर्वात पुढे असल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात बँक ऑफ इंग्लंडचे विद्यमान गव्हर्नर मार्क कार्नेय यांची मुदत संपत असून या  पदासाठी नवीन व्यक्तीचा शोध सुरु आहे. ब्रिटनचे चान्सलर फिलीप हॅमंड यांच्यामार्फत 'बँक ऑफ इंग्लंड'च्या गव्हर्नर पदाची निवड प्रक्रिया सुरु केली जाईल. 

या पदासाठी रघुराम राजन यांचे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र आपण बँकर नसून अकॅडेमिक (शिक्षण क्षेत्राशी संबंधित) असल्याचे सांगत या पदासाठी अर्ज करणार नसल्याचे सांगितले होते. यानंतर त्यांच्या नावाची चर्चा काही काळ थांबली होती. मात्र पुन्हा त्यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. विशेष म्हणजे, भारतात तिसऱ्या आघाडीचे सरकार सत्तेत आले तर रघुराम राजन यांना अर्थमंत्री बनविले जाईल अशा बातम्या देखील माध्यमांमध्ये झळकल्या होत्या.  

रघुराम राजन हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अर्थतज्ज्ञ असून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे ते वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी प्रमुख झाले होते. राजन हे त्यांच्या बुद्धिमत्तेबरोबरच स्पष्टवक्तेपणाबद्दल देखील ओळखले जातात. 

भारतात आरबीआयच्या गव्हर्नरपदी असताना राजन यांनी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली होती. आरबीआयशी कोणत्याहीप्रकारे सल्ला मसलत न करता सरकारने जनतेवर नोटाबंदीचा निर्णय लादण्यात आला असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते. 2005 मध्ये त्यांनी प्रसिद्ध केलेल्या शोध निबंधात आर्थिक मंदीचा अंदाजही व्यक्त केला होता. मात्र त्यावेळी त्यांच्या अंदाजाकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र तीनच वर्षात राजन यांचे भाकीत खरे ठरले. 

राजन यांच्यासोबत ब्रिटनमधील राजकारणी आणि अर्थतज्ज्ञ श्रिती वडेरा यांचे देखील नाव 'बँक ऑफ इंग्लंड'च्या गव्हर्नर पदासाठी चर्चेत आहे. रघुराम राजन हे बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर झाल्यास, तीनशे वर्षांची परंपरा असलेल्या बँक ऑफ इंग्लंडच्या प्रमुखपदी नेमले जाणारे ते दुसरे परदेशी नागरिक असतील. विद्यमान गव्हर्नर  मार्क कार्नेय हे कॅनडाचे रहिवाशी आहेत. विशेष म्हणजे, श्रिती वडेरा यांचा जन्म ब्रिटनमधला असला तरी त्या मूळ भारतीय वंशाच्या आहेत. 

Web Title: marathi news raghuram rajan top contender for bank of Englands governor post

संबंधित बातम्या

Saam TV Live