राहत फतेह अली खानच्या यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 30 जानेवारी 2019

राहत फतेह अली खानच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. परदेशी चलनाची तस्करी केल्याचा आरोप करुन अंमलबजावणी संचलनालयाने पाकिस्तानी सूफी गायक राहत फतेह अली खान यांना फेमाअंतर्गत नोटीस पाठवलीय. ईडीने राहत यांच्याकडे २ कोटी ६१ लाख रुपयांच्या रक्कमेचं उत्तर मागितलंय.

जर राहत यांनी दिलेलं उत्तर ईडीला पटलं नाही तर त्यांना ३०० टक्के दंड आकारण्यात येईल. तसंच त्यांनी दंड भरला नाही तर राहत यांच्या विरोधात लूकआऊट नोटीस जारी होऊ शकते. राहत यांना भारतात अवैधरित्या ३० लाख ४० हजार यूएस डॉलर मिळाले. यातले २ लाख २५ हजार डॉलरची राहत यांनी तस्करी केल्याचं बोललं जातंय.

2011 मध्ये राहत फतेह अली खान यांना दिल्लीत IGI विमानतळावर सव्वा लाख डॉलरसह अटक करण्यात आली होती.

WebTitle : marathi news rahat fateh ali khan gets notice from ED under FEMA

संबंधित बातम्या

Saam TV Live