राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार जाहीर

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

कोल्हापूर - आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत हिला केंद्र सरकारचा अर्जुन पुरस्कार आज जाहीर झाला. तसा मेल तिला मिळाल्याचे तिच्या कुटुंबियांनी सांगितले.

हा पुरस्कार मिळविणारी ती कोल्हापुरातील पाचवी खेळाडू आहे. यापूर्वी हा पुरस्कार राष्ट्रीय टेबल टेनिसपटू शैलजा साळोखे, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत, गोल्डन बॉय वीरधवल खाडे यांना मिळाला आहे.

उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या राहीने नेमबाजीमध्ये सातत्य राखत यंदा जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. त्यानंतर तिची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झाली होती. हा पुरस्कार तिला मिळणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. तिला पुरस्कार मिळाल्याचे जाहीर होताच क्रीडाप्रेमींत आनंदोत्सव झाला.

WebTitle : marathi news rahi sarnobat conferred with arjun award by sports ministry 

संबंधित बातम्या

Saam TV Live