२०१९ मध्ये जिंकलो तर 'मी' पंतप्रधान - राहुल गांधी  

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 8 मे 2018

२०१९ मध्ये जिंकलो तर पंतप्रधान बनू शकतो असं वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राहुल गांधींनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांना २०१९ निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला तर तुम्ही पंतप्रधान होणार का ? असा प्रश्न विचारला. यावर ‘हो नक्कीच’ असं उत्तर राहुल गांधींनी दिलं. २०१९ निवडणूक जवळ आली असून त्यानिमित्ताने सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाकडून नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार आहेत हे स्पष्ट आहे.

२०१९ मध्ये जिंकलो तर पंतप्रधान बनू शकतो असं वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राहुल गांधींनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांना २०१९ निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला तर तुम्ही पंतप्रधान होणार का ? असा प्रश्न विचारला. यावर ‘हो नक्कीच’ असं उत्तर राहुल गांधींनी दिलं. २०१९ निवडणूक जवळ आली असून त्यानिमित्ताने सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाकडून नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार आहेत हे स्पष्ट आहे. मात्र राहुल गांधी यांनी प्रथमच जाहीरपणे आपण पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचं सांगितलं आहे. भाजपा, आरएसएसकडून प्रत्येक संस्था आपल्या ताब्यात घेण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात असून काँग्रेसने त्यांचे प्रयत्न हाणून पाडले आहेत असं राहुल गांधी बोलले. यावेळी बोलताना राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर टीका करत काही प्रश्न विचारले.


संबंधित बातम्या

Saam TV Live