राहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवणार ?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 22 जानेवारी 2019

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. रायबरेली आणि अमेठी हे मतदारसंघ नेहमीच काँग्रेसचे गड मानले गेले आहेत. यातच तिसरा पर्याय म्हणून महाराष्ट्रातील नांदेड मतदारसंघाचे नाव घेतले जात आहे.

त्यामुळे राहुल गांधी नांदेड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक अमेठी या त्यांच्या बालेकिल्ल्यातून लढविली होती. मात्र, तेथे भाजपाच्या स्मृती इराणी यांनी त्यांना चांगलीच टक्कर दिली.

या मतदार संघातून पुन्हा स्मृती इराणी याच भाजपाच्या उमेदवार असतील असेही सांगितले जात आहे. त्यामुळे, राहुल गांधी यांच्यासाठी नांदेड आणि रायबरेली मतदार संघाचा पर्याय असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
WebTitle : marathi news rahul gandhi may contest loksabha election from nanded 

संबंधित बातम्या

Saam TV Live