#MeToo ...आता वेळ आलीः राहुल गांधी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

नवी दिल्लीः #MeToo ही मोहीम जगभरात गाजत असून, अनेक महिला त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार, शोषण, छळ, गैरवर्तनाबाबत बोलत आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी या अभिनायाचे समर्थन केले असून, बदल घडविण्यासाठी खऱया गोष्टीबद्दल बोलले पाहिजे, असेही गांधी म्हणाले.

#MeToo या अभिनायानाबद्दल राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. गांधी यांनी म्हटले आहे की, 'आता बदलाची वेळ आली आहे. यापुढे प्रत्येक व्यक्ती महिलांबरोबर सन्मानपुर्वक व मर्यादेने वागेल. बदल घडविण्यासाठी खऱया गोष्टीबद्दल मोठ्या आवाजात बोलावे लागले.'

राहुल गांधी यांनी ट्विट केल्यानंतर नेटिझन्सनी त्यांच्या ट्विट रिट्वीट करण्याबरोबरच प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, हॉलिवूडमधील लैंगिक शोषण, छळ, गैरवर्तनासंदर्भात गेल्या वर्षी #MeToo ही मोहीम सोशल मीडियावर सुरु करण्यात आली. #MeToo ही मोहिम सध्या जगभरात सुरू आहे. भारतात अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केल्यानंतर अनेक महिलांनी अन्यायाला वाचा फोडली आहे. बॉलिवूडनंतर क्रीडा, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात हे वादळ घोंगावू लागले आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live