राहुल गांधी यांना 'पप्पू' म्हणून  हिणवलं जात होतं; 'पप्पू'चा आता 'परमपूज्य' झाला - राज ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

मुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना 'पप्पू' म्हणून हिणवले जात होते. मात्र, पप्पूचा आता परमपूज्य झाला आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. या निकालातून देशभरातील भाजपविरोधातील नाराजी दिसत आहे. भाजपवर ही वेळ येणार होती, असेही ते म्हणाले.

राजस्थान, मध्यप्रदेश, मिझोराम, तेलंगणा आणि छत्तीसगड या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. यामध्ये काँग्रेस आघाडीवरून असून, भाजप पिछाडीवर आहे. त्यावर राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये ते म्हणाले, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान मोदींची गेल्या साडेचार वर्षांची कामगिरी जनतेने पाहिली. भाजपवर ही वेळ येणार होती. 2017 मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला 165 मिळणे अपेक्षित होते. मात्र, 99 जागा मिळाल्या. कर्नाटकात जी परिस्थिती दिसली आता या राज्यांत दिसत आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, सध्याची परिस्थिती आणि वस्तुस्थिती देशाला माहीत आहे. मोठ्या धोक्याच्या अगोदर ऊर्जित पटेलांना राजीनामा दिला असावा. आगामी लोकसभेतील निकाल यातून दाखवले आहे. देशभरातील भाजपविरोधातील नाराजी यातून दिसत आहे. देशाला राम मंदिराची नाहीतर राम राज्याची गरज आहे. आता जनता भाजपला मतदान करेल असे वाटत नाही.

दरम्यान, या निवडणुकीत होत असलेल्या विजयाबद्दल जनतेचे अभिनंदन. हा चांगला पायंडा आहे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातील परिस्थितीवर विचारले असता 'मिलते हे ब्रेक के बाद', असे म्हणत बोलणं टाळले.

Web Title : marathi news rahul gandhi is now parampujya says MNS chief raj thackeray 

संबंधित बातम्या

Saam TV Live