सत्तेत आल्यावर जीएसटी प्रणाली बदलणार : राहुल गांधी

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 12 मे 2019

प्रश्‍न : तुम्ही सत्तेवर आलात तर हे सगळे बदलाल?

प्रश्‍न : तुम्ही सत्तेवर आलात तर हे सगळे बदलाल?

उत्तर : निश्‍चितच! जीएसटी बदलला जाईल. सध्याची जीएसटी प्रणाली भारताला कमजोर करणारी आहे. आपल्याला एक कर हवाय, कमी कर हवाय आणि सुटसुटीत कर हवाय. त्याच्या नोंदी ठेवणे, अहवाल देणे सोपे असावे. कोणत्याही तज्ज्ञाची मदत न घेता सामान्य व्यक्तीही आपल्या कराची विवरणपत्रे स्वतः दाखल करू शकेल, एवढी सुटसुटीत प्रणाली हवी. त्यादृष्टीने आम्ही आमचा गृहपाठही केलेला आहे. जीएसटीमध्ये बदल केला पाहिजे, एवढेच मी म्हणत नाही, आम्ही जीएसटी बदलाच्या प्रक्रियेबाबत आभ्यासही केलेला आहे. त्याचे गणित आम्हीही मांडलेले आहे. देशाला एकच जीएसटी हवा या कल्पनेची चाचणीदेखील आम्ही घेतलेली आहे.

राहुल गांधी यांची संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

RahulWithSakal : काँग्रेसच देईल गरिबांना ‘न्याय’ (राहुल गांधींची मुलाखत)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची Exclusive मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

ModiWithSakal : आता अजेंडा स्वप्नपूर्तीचा! (पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत)

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर घणाघाती टीका करत आहेत. काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा, जीएसटी, काश्‍मीर, राष्ट्रवादाचा मुद्दा, हिंदुत्व अशा अनेक विषयांवर राहुल गांधी यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्याशी मनमोकळी बातचीत केली. काँग्रेसची धोरणे, पुढची वाटचाल याविषयी बोलताना काँग्रेसच गरिबांना ‘न्याय’ देईल, यावर गांधी यांनी भर दिला.

Web Title: Rahul Gandhi opens up about GST in an exclusive interview with Abhijit Pawar


संबंधित बातम्या

Saam TV Live