'मोदी यांनी चोरी केली', असं न्यायालयानं म्हटल्याच्या विधानाबाबत राहुल गांधी यांची माफी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 22 एप्रिल 2019

नवी दिल्ली : राफेल विमान खरेदी प्रकरणाच्या निकालाबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माध्यमांमध्ये केलेली टिप्पणी ही मूळ निकालाशी फारकत घेणारी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्यानंतर आज (सोमवार) राहुल गांधी यांनी माफी मागत राजकीय प्रचारासाठी याचा वापर केल्याचे म्हणत हा शब्द पुन्हा वापरणार नाही, असे म्हटले आहे.

याप्रकरणी 22 एप्रिलपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे आदेश न्यायालयाने राहुल यांना यूपूर्वीच नोटीस बजावली होती. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी हे स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे. विरोधकांनी मी राफेलवर केलेल्या वक्तव्याच्या विपर्यास केल्याचेही त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे. राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावरून सरकारवर टीका करताना 'मोदी यांनी चोरी केली', असे न्यायालयाने म्हटल्याचे विधान केले होते.

भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी न्यायालयाच्या निकालाचा अवमान झाल्याची तक्रार करत याचिका दाखल केली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने राहुल यांना त्यांची निरीक्षणे न्यायालयाच्या निकालाचा भाग असल्याचे चुकीचे सांगितल्याचे स्पष्ट केले. तसेच, राफेल करारासंदर्भात दाखल झालेल्या कागदपत्रांच्या वैधतेबाबत खटला असल्याने अशी कोणतीही निरीक्षणे नोंदविण्याची न्यायालयाला कधीही गरज पडली नाही, असेही खंडपीठाने सांगितले आणि राहुल यांना त्यांच्या विधानाबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते. 

संबंधित बातम्या

Saam TV Live