राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली दिल्लीत सीबीआय कार्यालयासमोर काँग्रेसची निदर्शनं

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

दिल्लीत सीबीआय कार्यालयासमोर काँग्रेसची निदर्शनं सुरू आहेत.. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आलाय. देशभरात सीबीआय कार्यालयासमोर काँग्रेसचं आंदोलन सुरू असून या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. सीबीआयमधील वादावर राहुल गांधींनी टीका करत राफेलमधील घोटाळा समोर येऊ नय म्हणून कारवाई केल्याचा आरोप भाजपवर केला होता. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने निदर्शन सुरू केलंय.

दिल्लीत सीबीआय कार्यालयासमोर काँग्रेसची निदर्शनं सुरू आहेत.. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आलाय. देशभरात सीबीआय कार्यालयासमोर काँग्रेसचं आंदोलन सुरू असून या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. सीबीआयमधील वादावर राहुल गांधींनी टीका करत राफेलमधील घोटाळा समोर येऊ नय म्हणून कारवाई केल्याचा आरोप भाजपवर केला होता. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने निदर्शन सुरू केलंय. सीबीआय प्रमुख आलोक वर्मा यांना तत्काळ सुट्टीवरून परत बोलावण्यात यावं तसंच देशातील प्रमुख तपास संस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्याबदद्ल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आलीय. 

 

 

मुंबईतही काँग्रेस आंदोलकांची निदर्शने 

राफेलच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक झालेली असताना मुंबईत काँग्रेस आंदोलकांनी निदर्शने केली. संजय निरुपमांसह अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. देशभरात सीबीआय कार्यालयासमोर काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे...राफेल घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या सीबीआयचे संचालक अलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या निर्णयाचा काँग्रेसने विरोध केलाय. या विरोधात मुंबई काँग्रेसतर्फे सीबीआयच्या मुंबई बिकेसीतील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केलाय.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live