दिल्ली विमान अपघातातून वाचल्यानंतर राहुल गांधी शिवचरणी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे कैलास मानससरोवर यात्रेसाठी गेल्याची माहीती काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे. कर्नाटक निवडणुकाच्यावेळी राहुल गांधी एका विमान अपघातातून वाचले होते. त्यावेळीच त्यांनी मानससरोवर यात्रेसाठी जाऊन शिवचरणी लीन होण्याचा निर्णय घेतला होता, असे सुरजेवाला यांनी सांगितले.

जवळपास 12 ते 15 दिवस राहुल गांधी यांचा हा दौरा असेल. कर्नाटक निवडणुकाच्यावेळी 26 एप्रिल रोजी दिल्लीवरुन हुबळीला जात असताना राहुल गांधींचे विमान अचानक 735 फुट खाली आले होते आणि ही गोष्ट डीजीसीएच्या अहवालामध्ये नोंद करण्यात आलेली असल्याचेही सुरजेवाला यांनी यावेळी सांगितले. त्यावेळी विमानात राहुल गांधीसोबत दोन पायलट, एक केबिन क्रू आणि एक इंजीनियर असे मिळून पाच प्रवासी होते.

Web Title: Rahul Gandhi visit kailas manas sarovar yatra

संबंधित बातम्या

Saam TV Live