राहुल गांधी दिसणार संघाच्या कार्यक्रमात?

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीतील आगामी कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात येणार आहे. संघावर टीका करणाऱ्या राहुल गांधी यांनाच या कार्यक्रमासाठी आमंत्रण देण्यात येणार असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

17 ते 19 सप्टेंबरदरम्यान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राहुल गांधींबरोबरच अनेक विरोधी विचारांच्या नेत्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सिताराम येचुरी यांनाही या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात येणार आहे.  
अशाच प्रकारे जून महिन्यात नागपूरमधील संघाच्या मुख्यालयातील कार्यक्रमाचे आमंत्रण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना होते. त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याने पक्षातून त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. राहुल गांधी यांनी यावर कोणतेही अधिकृत भाष्य केले नव्हते, पण काँग्रेसच्या इतर नेत्यांनी सोशल मीडियावर प्रणव मुखर्जींबाबत नाराजी व्यक्त केली होती. 

'भारतीय जनता पक्ष हा संघाच्या विचारांवर चालतो,' अशी टीका राहुल यांनी बऱ्याचदा केली आहे. नुकत्याच झालेल्या जर्मनी दौऱ्यातही त्यांनी संघाची तुलना मुस्लिम दहशतवादी संघटना ब्रदरहूडशी केली होती. 'माझ्यावर कायम टीका करणे हा संघाचा अजेंडा आहे, त्यामुळे माझ्यात राजकीय नेता म्हणून बरीच प्रगती होत आहे', असेही राहुल यांनी सांगितले होते.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live