'आरबीआय'ची भूमिका द्रविडसारखी हवी, सिद्धूसारखी नाही : रघुराम राजन

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली : स्वायत्ततेच्या मुद्द्यावरुन रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकारमध्ये धुमसत असलेल्या वादात आता बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी उडी घेतली आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या व्यवस्थापनाची भूमिका ही टिकून खेळणाऱ्या राहुल द्रविडसारखी असावी, न की चढ्या आवाजात कॉमेंट्री करणाऱ्या नवज्योत सिद्धूसारखी, असा सल्ला राजन यांनी बॅंकेला दिला आहे. 

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. राजन म्हणाले, ""केंद्र सरकार व आरबीआयने एकमेकांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. याबरोबरच एकमेकांच्या अधिकार क्षेत्राचा सन्मान करणेही तितकेच महत्त्वाचे असून, बॅंकेच्या स्वायत्ततेचा सन्मान ही देशहिताच्यादृष्टीने चांगली बाब आहे.'' 

कलम-7 चा वापर झाला असता तर, दोन्ही पक्षातील वाद आणखी विकोपाला गेला असता. मात्र, केंद्र सरकारने त्याचा वापर टाळला. आरबीआय व केंद्र सरकार एकमेकांचा सन्मान ठेवून काम करीत असल्याचे यावरून स्पष्ट होते, असेही राजन यांनी नमूद केले. 

नकार देण्याचा "आरबीआय'ला अधिकार 
विकासाला चालना देण्यावर सरकारचा भर असतो. हे करताना "आरबीआय'ने ठरविलेल्या मर्यादेचे पालन करावे लागते, त्यामुळे अशावेळी बॅंकेने सौम्य भूमिका घ्यावी. अर्थव्यवस्थेत स्थिरता टिकवून ठेवणे ही बॅंकेची जबाबदारी असल्याने त्यासाठी बॅंकेलाच जबाबदार धरले जाते. त्यामुळे प्रसंगी केंद्र सरकारला नाही म्हणण्याचा अधिकार बॅंकेला असल्याचे रघुराम राजन यांनी स्पष्ट केले. 

बॅंकेच्या व्यवस्थापनाच्या भूमिकेत झालेला बदल हा चिंताजनक असून, बॅंकेच्या संचालकांनी एकमेकांचे समर्थन करण्याऐवजी हे मतभेद दूर करण्यासाठी एकत्र येणे अपेक्षित आहे. तरच हा वाद संपुष्टात येईल. 
- रघुराम राजन, आरबीआयचे माजी गव्हर्नर 

WebTitle : marathi news rahumram rajan ex rbi governor gives advice to RBI 

संबंधित बातम्या

Saam TV Live