रायगडमध्ये आभाळ फाटल्यागत पाऊस

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 7 जुलै 2018

रायगडमध्ये आभाळ फाटल्यागत पाऊस पडण्यास सुरुवात झाली असून गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. रायगडमध्ये सातत्याने पडणाऱ्या या पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय. कर्जत रेल्वे स्टेशनजवळील रुळांवर पावसाचं पाणी आल्याने, रेल्वे वाहतूक वळवण्यात आली आहे. पावसामुळे प्रगती, नांदेड-पनवेल, पुणे-भुसावळ एक्स्प्रेसचे मार्गात बदल करण्यात आले आहेत.

रेल्वेची कर्जत-कल्याण वाहतूक ठप्प:
मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची कर्जत-कल्याण वाहतूक ठप्प झाली होती. कल्याण स्टेशन परिसरातही काही ठिकाणी रुळ पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय. कल्याण स्टेशनवरील 3 आणि 4 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरील रुळांवर पावसाचं पाणी आल्याने, कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live