4 तासांनी रेल रोको आंदोलन मागे.. 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 20 मार्च 2018

सकाळी 7 वाजल्यापासून सुरु असलेलं रेल्वे प्रशिक्षणार्थीचं आंदोलन अखेर 4 तासांनी मागे घेण्यात आलं.

अप्रेंटीस प्रशिक्षणार्थ्यांना रेल्वेत नोकरी मिळालीच पाहिजे, अशी मागणी करत शेकडो विद्यार्थी मंगळवारी सकाळी दादर- माटुंगादरम्यान रेल्वे रुळावर उतरले. गेल्या तीन ते चार वर्षांपासून आम्ही रेल्वेकडे पाठपुरावा करत आहोत. पण आम्हाला न्याय मिळाला नाही. शेवटी नाईलाजास्तव आम्ही रेल रोको केला, असे एका विद्यार्थ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

हे आंदोलन मागे घेण्यापूर्वी मुंबईतील मध्य रेल्वेची वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली होती. दादर- मांटुगादरम्यान विद्यार्थ्यांनी रेल रोको केल्याने मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली. रेल्वे परीक्षा गोंधळाविरोधात विद्यार्थी रेल्वे रुळावर उतरले. पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना रेल्वे रुळावरुन हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडून रुळावरुन हटण्यास नकार दिला.

रेल रोकोमुळे होणाऱ्या त्रासासाठी आम्ही मुंबईकरांची माफी मागतो, असेही या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live