रेल्वे मोटरमनचं आंदोलन स्थगित... रेल्वे स्टेशन्सवर मात्र तुफान गर्दी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

रेल्वेच्या मोटरमननी आपलं आंदोलन स्थगित केलंय. रेल्वे प्रशासनासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मोटरमननं आंदोलन मागे घेतलेय.

मात्र, या आंदोलनाचा परिणाम रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर झाला, त्यामुळं मुंबईतील रेल्वे स्टेशनवर तुफान गर्दी पाहायला मिळाली..मात्र आता आंदोलन स्थगित झाल्यामुळं आपल्या घरी परतणाऱ्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लाल सिग्नल चुकवल्यास सेवेतून मुक्त करणे, रिक्त पदे भरणे आदी प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन पुकारलं होतं. मध्य रेल्वे मोटरमन श्रेणीत सध्या 271 पदे रिक्त आहे. पदांची भरती करतानाच कारवाईची तीव्रता कमी करण्याची मागणी मोटरमन वर्गातर्फे सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने केली आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live