डेक्कन क्वीनमधील खानपानाची पंगत उठणार ? 

अमोल कविटकर.
शनिवार, 18 मे 2019
  • डेक्कन क्वीन १ जून १९३० साली सुरू करण्यात आली. तेव्हापासून तिला ‘डायनिंग कार’ आहे. 
  • स्वतंत्र ‘डायनिंग कार’ असलेली पहिली गाडी म्हणूनही डेक्कन क्वीनचा गौरव केला जातो.
  • या गाडीची नोंद लिम्का बुकमध्ये झाली आणि तिला गुणवत्तेचे आंतरराष्ट्रीय मानांकनही मिळले.
  • गेल्या नव्वद वर्षांपासून डेक्कन क्वीनची ‘डायनिंग कार’ आणि प्रवासी यांचे अनोखे नाते आहे. 
  • त्यातील कटलेट, आमलेटसह सर्वच खाद्यपदार्थ प्रचंड लोकप्रिय ठरले आहेत. 

पुणे ते मुंबई दरम्यान रोजचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सर्वात लाडकी गाडी आणि सेकंड होम अशी डेक्कन क्वीनची ओळख..या गाडीतील खानपान व्यवस्थेची ऐतिहासिक डायिनग कार काढून टाकण्याचा घाट मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून घातला जातोय. त्याबाबतचा प्रस्तावही वरिष्ठांकडे ठेवण्यात आलाय. मात्र रेल्वे प्रवाशांनी याला तीव्र विरोध केलाय. डायनिंग कार काढून टाकल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा प्रवाशांनी दिलाय. 

  • डेक्कन क्वीन १ जून १९३० साली सुरू करण्यात आली. तेव्हापासून तिला ‘डायनिंग कार’ आहे. 
  • स्वतंत्र ‘डायनिंग कार’ असलेली पहिली गाडी म्हणूनही डेक्कन क्वीनचा गौरव केला जातो.
  • या गाडीची नोंद लिम्का बुकमध्ये झाली आणि तिला गुणवत्तेचे आंतरराष्ट्रीय मानांकनही मिळले.
  • गेल्या नव्वद वर्षांपासून डेक्कन क्वीनची ‘डायनिंग कार’ आणि प्रवासी यांचे अनोखे नाते आहे. 
  • त्यातील कटलेट, आमलेटसह सर्वच खाद्यपदार्थ प्रचंड लोकप्रिय ठरले आहेत. 

पुणे-मुंबई दरम्यान प्रवाशांची संख्या वाढलीय. अधिक प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी डेक्कन क्वीनची डायनिंग कार काढून त्या जागी प्रवासी डबा जोडण्याचं नियोजन असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात येतंय. मात्र, प्रवासी डबा लावण्यासाठी डायनिंग काचा बळी कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जातोय.

WebTitle : marathi news railways to close pantry section of Deccan queen 

संबंधित बातम्या

Saam TV Live