तुम्ही प्लास्टिकच्या पावसात भिजताय!

अमोल कविटकर, साम टीव्ही, पुणे
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019
  • आकाशातून पडतोय प्लास्टिकचा पाऊस!
  • तुम्ही प्लास्टिकच्या पावसात भिजताय!
  • पाऊस नव्हे मोठ्या धोक्याची घंटा

आतापर्यंत तुम्ही पैशाचा पाऊस,काळा पाऊस,माश्यांचा पाऊस ऐकला असेल मात्र आता तर चक्क प्लास्टिकचा पाऊस पडतोय. यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र,  हे खरं आहे. आता प्लास्टिकचा पाऊस पडतोय, पावसात हे प्लास्टिक आले कोठून यांचा अद्याप खुलासा झालेला नाही. मात्र मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर हेच याचं कारण मानलं जातंय.

पावसाच्या पाण्याची चाचणी केली असता त्यात 90 टक्के प्लास्टीकचे कण आढळले. यातील बहुतेक प्लास्टीक फायबर स्वरुपात आहे. सर्वाधिक कण हे निळ्या रंगाचे असून लाल, चंदेरी, जांभळा, हिरवा, पिवळा आणि अन्य रंगाचे कण आढळलेत. विशेष म्हणजे प्लास्टिकचे हे कण इतके सूक्ष्म आहे, की ते उघड्या डोळ्यांनी बघता येत नाही. मायक्रोस्कोप किंवा डिजिटल कॅमेऱ्याच्या विशेष लेन्स मधून ते दिसतात 

यापूर्वी झालेल्या अभ्यासात प्लास्टिकचे असंख्य कण समुद्रात मिसळल्यानं माशांवर परिणाम होत असल्याचं समोर आलंय. इतकंच काय तर आपल्या शरिरातही दर आठवड्याला सरासरी 5 ग्रॅम प्लास्टिक जातं. धक्कादायक म्हणजे हे प्लास्टिक एका क्रेडिट कार्डच्या वजनाएवढं आहे. सध्या प्लास्टिकचा वाढता वापर ही जगासमोरची मोठी समस्या आहे. त्यामुळं दिवसेंदिवस ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढतोय. सध्या तरी अमेरिकेत प्लास्टिकचा पाऊस पडल्याचं संशोधनातून समोर आलंय. मात्र, भारतातही प्लास्टिकचं प्रमाण वाढत असल्यानं भविष्यात भारतातही हा धोका निर्माण होऊ शकतो. 

WebTitle : marathi news rain with 90 percent of plastic content found in united states

 


संबंधित बातम्या

Saam TV Live