पुढील चार दिवसांत राज्यात सर्वत्र हलक्या स्वरूपाचा पाऊस

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 27 जुलै 2018

पुढील चार दिवसांत राज्यात सर्वत्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण उत्तर प्रदेश व लगतच्या क्षेत्रावर कमी दाबाचा पट्टा असून, पुढील 2 ते 3 दिवसांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने येत्या आठवड्यात मध्य व उत्तर भारतात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुढील आठवड्यात राज्यातील पाऊसमान सामान्य राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

आतापर्यंत कोकण, गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. मराठवाड्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live