पुढील चोवीस तासांमध्ये उत्तर-मध्य महाराष्ट्रात काही भागात अतिवृष्टीचा इशारा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

आतापर्यंत पावसाने ओढ दिलेल्या उत्तर-मध्य महाराष्ट्रात पुढील चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान खात्याने गुरुवारी दिला. पश्‍चिम विदर्भातील काही भागात मुसळधार पाऊस पडेल, तर पुण्यात पुढील दोन- तीन दिवस पावसाच्या एक- दोन सरी पडतील, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले.

राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्‍चिम विदर्भातील काही भाग आणि दक्षिण महाराष्ट्र येथे पावसाने ओढ दिली आहे, त्यामुळे या भागात गेल्या अडीच महिन्यातील पावसाची सरासरीही गाठली गेली नाही. या पार्श्‍वभूमीवर बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

जोरदार पावसाची शक्‍यता
महाराष्ट्राचा उत्तर भाग आणि गुजरातचा दक्षिण भाग या दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. तसेच, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील अनेक भागांत पाऊस पडत आहे. शुक्रवारी (ता. 17) पश्‍चिम विदर्भ, कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

WebTitle : marathi news rain forecast north and central maharashtra 

संबंधित बातम्या

Saam TV Live