पवना धरण शंभर टक्के भरलं, सिंधुदुर्गात पावसाचं कमबॅक  

पवना धरण शंभर टक्के भरलं, सिंधुदुर्गात पावसाचं कमबॅक  

पिंपरी चिंचवड आणि मावळ मधील नागरिकांचा आता पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पवना धरण शंभर टक्के भरलं असून, धरणातून विद्युत निर्मितीसाठी अखंडपणे 1300 क्युसेक इतक्या वेगाने पाण्याची विसर्ग सुरू झाली आहे. आगामी काळातही पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणात येणारा पाणीसाठा आणि विद्युतगृहातून होणारा विसर्ग यांचं संतुलन ठेवून, गरजेनुसार सांडव्यातून पाणी सोडण्यात येणार आहे. 

सिंधुदुर्गात पावसाचं कमबॅक : 

सिंधुदुर्गात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा कमबॅक केलंय. त्यामुळे बळीराज्याच्या मनात आनंदाचं वातावरण आहे. कणकवली, वैभववाडी, देवगड, कुडाळ या भागामध्ये मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी तुरळक सरी पडल्याची माहिती मिळतेय. येत्या दोन दिवसांमध्ये अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हरिद्वारमध्ये पावसाचं थैमान :  

तर, उत्तराखंडमधल्या हरिद्वारमध्ये पावसाने थैमान घातलंय. मुसळधार पावसामुळे गोरीमाफी गावात पूर आला असून इथल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येतंय. नागरिकांच्या मदतीसाठी गेल्या तीन दिवसांपासून एसडीआरएफचं पथक तैनात आहे. संपूर्ण गावात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून अद्यापही 200 हून अधिक नागरिक याठिकाणी अडकून पडलेत..
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com