शनिवारी आणि रविवारी मुंबईत हलक्या स्वरूपाचा पाऊस 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 7 एप्रिल 2018

राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने धिंगाणा घातला असतानाच आता शनिवारी आणि रविवारी मुंबईत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. तसंच, मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33 आणि 23 अंशांच्या आसपास राहील असाही अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. आजही म्हणजे (7 एप्रिल) रोजी मध्य-महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने धिंगाणा घातला असतानाच आता शनिवारी आणि रविवारी मुंबईत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. तसंच, मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33 आणि 23 अंशांच्या आसपास राहील असाही अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. आजही म्हणजे (7 एप्रिल) रोजी मध्य-महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 8 एप्रिल रोजी दक्षिण कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live