दक्षिण मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये पावसाची दमदार हजेरी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 7 जून 2018

दक्षिण मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पहाटेपासूनच विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. अंधेरी, मालाड, कांदिवली, दहिसरमध्ये पाऊस पडतोय. यासोबतच कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर आणि मुलुंडमध्येही पावसाने हजेरी लावली आहे. चर्चगेट आणि सीएसटीला पहाटे विजांच्या कडकडाटात जोरात पाऊस सुरु झाला होता. सोमवारी मुंबईत जोरदार पाऊस पडल्यानंतर पाऊस गायब झाला होता. दोन दिवस मुंबईकर उकाड्याने हैराण झाले होते.

दक्षिण मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पहाटेपासूनच विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. अंधेरी, मालाड, कांदिवली, दहिसरमध्ये पाऊस पडतोय. यासोबतच कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर आणि मुलुंडमध्येही पावसाने हजेरी लावली आहे. चर्चगेट आणि सीएसटीला पहाटे विजांच्या कडकडाटात जोरात पाऊस सुरु झाला होता. सोमवारी मुंबईत जोरदार पाऊस पडल्यानंतर पाऊस गायब झाला होता. दोन दिवस मुंबईकर उकाड्याने हैराण झाले होते. आज पडत असलेल्या पावसामुळे मुंबईकरांना उकाड्यातून थोडा दिलासा मिळालाय. तसंच 8 ते 10 जून दरम्यान मुंबईत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live