पावसाचा पॅटर्न बदलला! ऑक्टोबरमध्येही पावसाचा जोर कायम

साम टीव्ही
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020
  • महाराष्ट्रात मुसळधार
  • पावसाचा पॅटर्न बदलला!
  • ऑक्टोबरमध्येही पावसाचा जोर कायम

राज्यात सध्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलाय. फक्त यंदाच नव्हे तर गेल्या चार पाच वर्षांपासून मॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबलाय. खरंच पावसाचा पॅटर्न बदललाय का?

एरव्ही सप्टेंबरच्या अखेरपर्यंत राज्यातून एक्झिट घेणारा पाऊस यंदा मात्र अर्धा ऑक्टोबर उलटून गेला, तरी परतण्याचं नाव घेत नाहीए. गेल्या दोन- तीन दिवसांपासून मुंबई, ठाण्यासह दक्षिण कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे पावसाचा पॅटर्न बदलल्याची चर्चा सुरू झालीय. 

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा जोर कायम आहे. गेल्या वर्षी ९ ऑक्टोबरपासून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला होता. त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत पाऊस बरसत होता. विशेष म्हणजे गेल्या चार-पाच वर्षांपासून परतीच्या पावसाच्या वेळापत्रकात बदल झाल्याचं दिसून आलंय. हवामान विभागाच्या गेल्या काही वर्षांच्या नोंदींमध्येही ऑक्टोबरमध्ये पाऊस जास्त पडत असल्याचं दिसून आलंय. 

हा परतीचा पाऊस शेतकऱ्यांसाठी मात्र जीवघेणा ठरतोय. कारण परतीच्या पावसात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. त्यामुळे खरोखरच पावसाचा पॅटर्न बदलला असेल, तर त्याचा सखोल अभ्यास होणं आवश्यक आहे. म्हणजे त्यानुसार पिक पेरणीचं नियोजन करून शेतकऱ्यांचं संभाव्य नुकसान टाळता येईल.


संबंधित बातम्या

Saam TV Live