विदर्भ आणि मराठवाड्यात तहानेनं व्याकूळलेल्या जनेतेच्या चेहऱ्यावर फुललं हसू

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 24 जून 2019

खळाळत वाहणारं हे पाणी पाहून विदर्भ आणि मराठवाड्यात तहानेनं व्याकूळ झालेल्या जनेतेच्या चेहऱ्यावर हसू फुललंय. यंदाचा उन्हाळा इतका कडक होता भेगाळलेली धरणीमायसुद्धा अभाळाकडे डोळे लावून बसली होती. वरूणराजानं तिची हाक ऐकली आणि या दुष्काळभूमीत तो मनसोक्त बरसू लागलाय. 

खळाळत वाहणारं हे पाणी पाहून विदर्भ आणि मराठवाड्यात तहानेनं व्याकूळ झालेल्या जनेतेच्या चेहऱ्यावर हसू फुललंय. यंदाचा उन्हाळा इतका कडक होता भेगाळलेली धरणीमायसुद्धा अभाळाकडे डोळे लावून बसली होती. वरूणराजानं तिची हाक ऐकली आणि या दुष्काळभूमीत तो मनसोक्त बरसू लागलाय. 

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात रात्रभर आणि दमदार पाऊस झाल्यानं पैनगंगा नदीला पूर आलाय. पैनगंगा दुथडी भरून वाहू लागलीय. चिखली तालुक्यातील वळती  गावामधील पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला. पुराच्या पाण्यामुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. 

बीड : पहाटे बीड जिल्ह्यात रायमोह, शिरूर, केज या भागात झालेल्या पावसानं नदी-नाले भरून वाहू लागलेत.. बीड, गेवराई, माजलगाव, केज, शिरूर या भागात पावसानं दमदार हजेरी लावलीय.. बीड तालुक्यातील खालापूरी गावात झालेल्या पावसानं खोलीकरण केलेल्या ओढ्यात, नद्यांमध्ये अशाप्रकारे पाणी खळखळून वाहू लागलंय. 

 

 

लातूर : मान्सूननं रविवारी मराठवाड्यात एन्ट्री केल्यानंतर मध्यरात्री उशिरा ते पहाटेच्या सुमारास लातूर जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला...पावसानं हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावलाय. आता पेरणीच्या कामांना वेग येणारंय. 

अकोला : अकोल्यातील पणज परीसरात वादळी वाऱ्यामुळं केळी, लिंबू या पिकाचं प्रचंड नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत पडलाय.. 

जालना : जालना जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसानं हजेरी लावली. भोकरदन तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यानं रायघोळ नदीला पूर आलाय. शेलुद येथील धामणा धरण क्षेञातील गावामध्ये सकाळी झालेल्या पावसानं पाण्याचा ओघ सुरु झालाय. 

चंद्रपूर आणि नागपूर :  विदर्भात रविवारी चंद्रपूर आणि नागपुरात पावसानं दमदार हजेरी लावली. नागपूर जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस झाल्यानं सर्वसामान्यांसह शेतकरी सुखावलाय. विदर्भात मान्सून दाखल झाल्यानं शेतीच्या कामाला वेग येणारंय. 

परभणी  : परभणी जिल्ह्यातल्या सेलू शहर आणि परिसरात  विजेच्या कडकडाटा जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग येणारंय. 

धुळे : धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर आणि शिंदखेडा या तालुक्यात रात्रभर पावसाचा रात्रभर पावसाचा जोर होता. या पावसानं वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झालाय. 

WebTitle : marathi news rain soothes people of vidarbha and marathwada as rain comes after long break

 


संबंधित बातम्या

Saam TV Live