मुंबईसह नवी मुंबई आणि ठाण्यात पावसाचं कमबॅक; येत्या 48 तासांत कोकणात अतिवृष्टी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 23 जून 2018

मध्यरात्रीपासून मुंबईसह नवी मुंबई आणि ठाणे परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावलीये. दादर, कुलाबा परिसरासह उपनगरातही जोरदार पाऊस झालाय. तर तिकडे वसई, विरार परिसरातही मुसळधार पाऊस झालाय. दरम्यान येत्या 48 तासांत कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. कोकणातपाठोपाठ मुंबईमध्येही 27, 28, आणि 29 जूनला अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय..तर विदर्भ मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे.

पालघरमध्ये पावसाची जोरादार बॅटिंग

मध्यरात्रीपासून मुंबईसह नवी मुंबई आणि ठाणे परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावलीये. दादर, कुलाबा परिसरासह उपनगरातही जोरदार पाऊस झालाय. तर तिकडे वसई, विरार परिसरातही मुसळधार पाऊस झालाय. दरम्यान येत्या 48 तासांत कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. कोकणातपाठोपाठ मुंबईमध्येही 27, 28, आणि 29 जूनला अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय..तर विदर्भ मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे.

पालघरमध्ये पावसाची जोरादार बॅटिंग

काल रात्रीपासून वसई-विरारसह पालघरमध्ये पावसानं जोरादार बॅटिंग केलीय. वसईमध्ये पावसानं चांगलंच थैमान घातलंय. तर पालघरमध्ये रात्रीपासून संततधार सुरू आहे. वसई विरार नालासोपाऱ्यात दमदार पावसाची सुरवात पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं लोकांची चांगलीच तारांबळ उडालीय

पंढरपूरमध्ये मुसळधार 

पंढरपूरमध्ये मुसळधार पावसाला सुरूवात झालीय.. मागील आठ दिवसांपासून दडी मारुन बसलेल्या पावसाचं जोरदार आगमन झालं..पावसाच्या पाण्यामुळे शहरातील अनेक भागातील रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांची आणि भाविकांची तारांबळ उडाली.दोन दिवसांपासून तालुक्यातील सर्वच भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांच्या खरीप पेरणीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

कोरड्या पडलेल्या धावंडा नदीला पूर

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे काल रात्री पावसाची तुफान बॅटिंग कोरड्या पडलेल्या धावंडा नदीला पुर आलाय. रात्री दिग्रस परीसरात दमदार पाऊस झाल्याने धांवडा नदिला पुर आला. दुधडी भरून वाहाणार्या धावंडा नदिला आलेला पहिला पुर पाहण्यासाठी नागरीकांनी सकाळीच नदी काठावर गर्दी केली होती. तर १५ दिवसांपासुन दडी मारलेल्या पावसाचे पुनरागमन झाल्याने पीकांना संजिवनी मीळाल्यानं पावसाच्या प्रतिक्षेत असलेला बळीराजाही सुखावलाय. नदित पाण्याचा खळखळाट झाल्यानं जमीनीतील पाण्याची पातळी वाढण्याबरोबर धरणातील जलसाठा वाढणार असल्यानं नागरीकात आनंद पसरलाय. 

लातूरमध्ये पावसानं थैमान

लातूरमध्ये पावसानं थैमान घातलंय. उमरगा तालुक्यात रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. या पावसामुळे उमरगा तालुक्यातील लहान मोठे पाझर तलाव ओसंडून वाहु लागलेत. तर शहराजवळील पुणे हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पावसामुळे दोन तास खोळंबली होती. इथल्या अनेक भागात पाणी साचलं असून या जोरदार पावसामुळे ग्रामीण भागात मोठं नुकसान झालंय.

WebTitle : marathi news rain updates monsoon maharashtra 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live