पावसाचा मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेवर परिणाम..

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 25 जून 2018

जवळपास 14 दिवस दडी मारुन बसलेल्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झालीये. रात्रभर सतत कोसळत असलेल्या पावसाचा, मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेवर परिणाम झाला असून मुंबईच्या दिशेने होणारी हार्बर रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे.

तसंच पश्चिम रेल्वेवरील वांद्रे येथे ट्रॅकवर पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. मध्य रेल्वेवरील सायन येथेही पावसाचा परिणाम पाहायला मिळतोय. रात्रीपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे सायन रेल्वे स्थानकातही पाणी साचलं असून, रेल्वे वाहतूकीवरही परिणाम झाला आहे.

WebTitle : marathi news rain updates mumbai railways 

संबंधित बातम्या

Saam TV Live