‘मालाड येथील दुर्घटना म्हणजे महापालिकेचे अपयश नाही,’- संजय राऊत

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 3 जुलै 2019

मुंबई  - मुसळधार पावसातही मुंबई तुंबली नसल्याच्या महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्या दाव्यानंतरही शिवसेना नेत्यांनी ‘धाडसी’ वक्तव्ये करणे सुरूच ठेवले आहे. ‘मालाड येथील दुर्घटना म्हणजे महापालिकेचे अपयश नसून, मोठ्या पावसामुळे घडली आहे,’ असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

‘मुंबईला बसलेला पावसाचा फटका हा जागतिक तापमानवाढ आणि हवामानातील बदलांचा परिणाम आहे. त्यावरून कोणी राजकारण करू नये. मेट्रोच्या कामासाठी अनेक ठिकाणी खोदकाम सुरू असल्यामुळे पाणी साचले,’’ असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले होते; तर वातावरणातील बदलांमुळे एकाच वेळी जास्त पाऊस पडत असल्याचा दावा महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी सोमवारी (ता. १) केला होता.

Web Title: Rain Water Issue Municipal Unsuccess Sanjay Raut

संबंधित बातम्या

Saam TV Live