पुढील 24 तासात मध्य महाराष्ट्रातील काही भागांत अतिवृष्टीचा इशारा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 जुलै 2018

राज्यात अनेक भागात पावसाचा जोर कायम असून पुढील 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे नद्या-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. तसंच धरणांच्या पाणी पातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे.

पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा, नगर, नाशिकमधील धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातून यंदा प्रथमच पाणी सोडण्यात आले आहे.

WebTitle : marathi news rainfall forecasting maharashtra 

संबंधित बातम्या

Saam TV Live