कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा इशारा

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 16 जुलै 2018

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाची तीव्रता सध्या वाढत आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आजपासून मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. याच कालावधीत राज्यभर पाऊस जोर धरणार असल्याचा अंदाज आहे. बहुतांश भागात पावसाने हजेरी लावल्याने राज्यभरातील धरणांमध्ये पाणीसाठा जमा होत आहे.

मागील 24 तासांमध्ये कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या.

WebTitle : marathi news rainfall maharashtra heavy rain IMD 

संबंधित बातम्या

Saam TV Live