पावसाळी अधिवेशनाची सुरुवात विरोधकांच्या आंदोलनानं, विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी

साम टीव्ही
सोमवार, 7 सप्टेंबर 2020
  • विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी
  • मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शनं करत विरोधकांच्या घोषणा
  • वैद्यकीय प्रवेशावरुन विरोधक आक्रमक
  • 70-30चा फॉर्म्युला रद्द करण्याची मागणी

दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात विरोधकांच्या आंदोलनानं झालीये. विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केलीये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल होताच विरोधकांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे विधीमंडळात आल्यानंतर भाजप आमदारांकडून पायऱ्यांवर घोषणाबाजी करण्यात आली. वैद्यकीय प्रवेशासाठी असलेले प्रादेशिक आरक्षण रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. वैदकीय प्रवेश 70-30 चा फॉर्म्युला रद्द करत मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

 पाहा विधानसभेतून थेट लाईव्ह, विरोधकांची घोषणाबाजी -


संबंधित बातम्या

Saam TV Live