पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 1 जून 2019

नाशिक - पावसाळी अधिवेशनाला १७ जूनपासून सुरवात होत असून, त्यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठामपणाने सांगत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल, असा निर्वाळा दिला. वन विभागाच्या अधिकारी परिषदेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण म्हणजे, शून्य अधिक शून्य हे कधीही एक होत नाही, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली, तसेच दोन्ही काँग्रेसच्या विलीनीकरणातून स्पर्धा वाढेल आणि त्यातून साध्य काहीच होणार नाही असे सांगत, दोन्ही पक्ष शक्तिहीन झाल्याचा दावा त्यांनी केला. त्याच वेळी राज्यातील दुर्मीळ प्रजातीचा पक्ष म्हणजे, ‘मनसे’; असे टीकास्त्र सोडत ते म्हणाले, की लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज ठाकरेंनी सभांमधून पंतप्रधानांवर टीका करत आपला राग व्यक्त केला. जनतेने त्यांना मतांतून दाखवून दिले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेला सोबत घेतले, तरी त्याचा काही फायदा होणार नाही. राजकारणातील अस्तित्व दाखविण्यासाठी ‘मनसे’ची धडपड चालली आहे. मुळातच, प्रचारात टीका करावी. मात्र त्याला मर्यादा असते. ‘मनसे’ हे विसरून गेले. पक्षाचे विचार न पटल्याने एक आमदार आणि मुंबईतील सहा नगरसेवक शिवसेनेत गेले आहेत.

Web Title: Rainy Session Mantrimandal Expansion Sudhir Mungantiwar

संबंधित बातम्या

Saam TV Live