यांचे कपडे आम्ही काढले अन्‌ यांना आमचा पोपट दिसला- Raj Thackeray यांचा Fadanvis यांच्यावर हल्लोबोल

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 19 मार्च 2019

पुणे : देवेंद्र फडणवीस माझ्याविरोधात बरगळले.  यांचे कपडे आम्ही काढले आणि यांना आमचा पोपट दिसला. बघायचं असेल तर आणलंय सगळं असा जोरदार हल्लाबोल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. 

इतका खोटा पंतप्रधान माझ्या आयुष्यात कधी पाहिला नाही. सगळ्यांशी आणि सगळ्यांबाबत खोटा बोलणारे पंतप्रधान मोदी आहेत. गेल्या साडेचार वर्षात त्यांनी पहिले पंतप्रधान नेहरूना आणि इंदिरा गांधी यांना शिव्या घालण्याशिवाय त्यांनी काय केले असा संतप्त सवालही त्यांनी केला. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना राज म्हणाले, की मुख्यमंत्री फडणवीस हे माझ्यावर आरोप करीत आहे की मी बारामतीची स्क्रिप्ट वाचून दाखवितो. मला हे पोपट म्हणतात. पण, यांच्या लक्षात येत नाही की आम्ही यांचे कपडे काढले आहेत आणि यांना आमचा पोपट दिसला.'' 

ते पुढे म्हणाले, की मी उद्योगपती रतन टाटांच्या सांगण्यावरून गुजरातचा दौरा केला. तेथे जाऊन पाहणी केली. या पाहणीनंतर मी शेवटी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी मी म्हटले होते, की गुजरातपेक्षा महाराष्ट्राने चांगली प्रगती केली आहे. गुजरातपेक्षा महाराष्ट्रात उद्योगाचे जाळे मोठे आहे. महाराष्ट्र एक नंबर आहे. 

भाजपची मंडळी आज शरद पवारांवर टीका करीत आहेत तेच मोदी कसे श्री. पवार यांचे कौतुक करीत होते याची चित्रफितच यावेळी मनसेतर्फे दाखविण्यात आली. या सभेत कधी नव्हे ते राज यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. मी जे प्रश्‍न विचारतो आहे त्या प्रश्‍नाचे उत्तर भाजप सरकार देत नाहीत असेही ते म्हणाले. 

संबंधित बातम्या

Saam TV Live