"मुसलमानांच्या अशा अवलादींना ठेचलं पाहिजे", राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

साम टीव्ही
शनिवार, 4 एप्रिल 2020

मरकजमध्ये गेलेले लोक अद्यापही डॉक्टरांशी असभ्य वर्तन करताहेत. नोटांना थुंकी लावल्याचे व्हिडीओ व्हायरल होताहेत. नर्सेससमोर नग्न फिरताहेत. अशी कृत्य करणाऱ्यांना गोळ्या घालायला हव्या

राज ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेऊन मरकजच्या प्रकरणावर वाईट कृत्य करणाऱ्यांना चांगलंच तासलंय. 

मरकजमधल्या कोरोना पसरवणाऱ्या लोकांना गोळ्या घाला, असं म्हणत राज ठाकरेंनी मकरज प्रकरणावर टीका केलीय. मरकजमध्ये गेलेले लोक अद्यापही डॉक्टरांशी असभ्य वर्तन करताहेत. नोटांना थुंकी लावल्याचे व्हिडीओ व्हायरल होताहेत. नर्सेससमोर नग्न फिरताहेत. अशी कृत्य करणाऱ्यांना गोळ्या घालायला हव्या असं म्हणत त्यांनी कडाडून टीका केलीय. अशा लोकांना पोलिसांनी चांगलंच फोडून काढायला हवं. आणि या लोकांना मारतानाचे व्हिडीओ व्हायरल करावे. म्हणजे यापुढं असं करण्याची कुणी हिंमत करणार नाही असं त्यांनी म्हटलंय.
शिवाय मतदान कुणाला करायचं असं सांगणारे मौलवी आता कुठं आहेत. की मुद्दाम कट शिजवला जातोय असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

पाहा, सविस्तर व्हिडीओत पत्रकार परिषदेत राज ठाकरे नेमकं काय म्हणालेत...

 

 मोदींवरही कडाडून टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका करताना ते म्हणाले, की त्यांनी लोकांच्या मनातील गैरसमज दूर करायला हवे होते पण, तसे झाले नाही. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलताना कोरोनाच्या संकटात डॉक्‍टर्स, नर्स आणि माध्यमांतील मंडळी जिवावर उदार होऊन जे काम करीत आहेत त्यांनी आदर व्यक्त करतानाच आपला भक्कम पाठिंबा दिला. 

मात्र मरकजप्रकरणावर राज यांनी सकडून टीका केली. ते म्हणाले, की अशा लोकांना तर गोळ्या घातल्या पाहिजे. जर तुम्ही ऐकत नसाल आणि उद्या जर एखाद्या सरकारने कठोर भूमिका घेतली तर पुन्हा ओरडू नका असा दमही त्यांनी दिला. 

लॉकडाउनची शिस्त पाळली जाणार नाही तर अर्थसंकट निर्माण होईल अशी भीतीही व्यक्त केली आहे. इतकी शांतता आपण 92-93च्या दंगलीतही पाहिली नव्हती असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांनी लोकांच्या मनातील गैरसमज दूर करायला हवे होते असं म्हटलं आहे.  

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live