राज ठाकरे यांनी गणपती उत्सावातही मोदी आणि अमित शाह यांना केलं टार्गेट

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गणपती उत्सावातही मोदी आणि अमित शाह यांना टार्गेट केलं आहे. राज यांनी पुन्हा एकदा व्यंगचित्राच्या माध्यमांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाहांचा ढोल वाजविण्याचा प्रयत्न केला आहे.

राज यांनी गणेश प्रतिमेच्या जागी नरेंद्र मोदी आणि त्यांचे वाहन उंदराऐवजी अमित शाह यांना बसवले आहे. स्वताच्याच प्रसिद्धीच्या प्रेमात पडलेला प्रसिद्धी विनायक असा मथळाही राज यानी या व्यंगचित्रासोबत लिहिला आहे. दरम्यान, राज यांनी आपल्या व्यंगचित्रात मोदींकडून शाळेत करण्यात आलेल्या लघुपट सक्तीविषयीही भाष्य केले आहे. तसेच मोदींची आरती करताना, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांसह भाजपचे काही नेते दिसत आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live