तब्बल साडेआठ तासानंतर राज ठाकरे ED कार्यालयातून बाहेर; कृष्णकुंज बाहेर जल्लोष

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयातून आता बाहेर आले आहेत. सकाळी साडे अकरा वाजता त्यांच्या चौकशीला सुरवात झाली होती. तब्बल साडेआठ तासानंतर तासांनंतर त्यांची चौकशी संपलीये. 

प्रकरणी राज ठाकरे यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात बोलविण्यात येईल, अशी शक्यता होती. मात्र, आज त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या पत्नी शर्मिला, त्यांची मुलगी उर्वशी आणि मुलगा अमित ठाकरे यांनाही चौकशीसाठी नेण्यात आले होते. 

दरम्यान, राज ठाकरे यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आल्याचे समजल्यानंतर काल रात्रीपासूनच मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरु होती. राज ठाकरे यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर कृष्णकुंज बाहेर मनसे कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केलाय.

 WebTitle  marathi news raj thackeray comes out after more than eight long hours MNS party workers delighted 

संबंधित बातम्या

Saam TV Live