राज ठाकरे आणि सोनिया गांधी भेट.. दिल्लीत 'राज'कीय खलबतं ?

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 8 जुलै 2019

नवी दिल्ली : दिल्ली दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये कार्य चर्चा झाली ते मात्र समजू शकलेले नाही. 

नवी दिल्ली : दिल्ली दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये कार्य चर्चा झाली ते मात्र समजू शकलेले नाही. 

महाराष्ट्रात पुढच्या तीन महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सोनिया गांधींची घेतलेली भेट खूप महत्वपूर्ण आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी राज ठाकरेंच्या सभा भरपूर गाजल्या होत्या. जाहीर सभांमधून त्यांनी मोदींच्या भाषणाचे जुने व्हिडिओ आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामधली तफावत दाखवून दिली होती. राज ठाकरेंच्या सभांची चर्चा भरपूर झाली. पण प्रत्यक्षात मतदारांवर त्याचा फारसा परिणाम झाला नाही.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये सहभागी होणार की स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाणार ते लवकरच स्पष्ट होईल. दरम्यान, सोनिया गांधींच्या भेटीला जाण्याआधी राज ठाकरेंनी सकाळी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. ईव्हीएमध्ये मोठा घोळ झाला आहे, जे जिंकले आहेत त्यांना जिंकून कसे आलो याबाबत शंका आहे. मतदारांना त्यांनी कुणाला मतदान केलं ते समजलं पाहिजे. मी त्याच संदर्भात निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. निवडणूक आयोगाकडून मला शून्य अपेक्षा आहे. कारण त्यांच्याशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर जे काही हावभाव होते त्यावरूनच हे लक्षात येत होतं की त्यांना आमच्या बोलण्यात काहीही स्वारस्य नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं.

WebTitle : marathi news raj thackeray meets sonia gandhi in delhi 


संबंधित बातम्या

Saam TV Live