राज ठाकरेंसाठी यंदाची विधानसभा ठरू शकते लकी..

वैदेही काणेकर, सामटीव्ही मुंबई
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका 21 ऑक्टोबर तर मतमोजणी 24 ऑक्टोबरला होतेय. आता तुम्ही म्हणाल त्यात काय नवीन. ही माहिती तर सर्वांनाच आहे. पण या दोन तारखांचा जुळून आलेला योग मनसेप्रमुख राज ठाकरेंसाठी लकी आहे, असं म्हटलं तर? 

या दोन तारखांच्या आकड्यांची बेरीज करूया : 
2+1+2+4 ही बेरीज होतेय 9 आणि 9 या आकड्याशी राज ठाकरेंचा फारच जवळचा संबंध आहे.

राज ठाकरे या क्रमांक स्वतःसाठी लकी आहे, असं मानतात. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी आणि 9 च्या आकड्याचा नेहमीच एक जवळचा संबंध राहिलाय.

  • राज ठाकरेंनी शिवसेनेचं नेतेपद 27 डिसेंबर 2005ला सोडलं.
  • शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली 18 जानेवारी 2006 ला.
  • मनसेची स्थापना त्यांनी 9 मार्च 2006ला केली 
  • इतकंच काय टेलिकॉम कंपन्यांना मराठीत सेवा द्यायला 27 फेब्रुवारी 2010 रोजी बजावलं.
  • राज ठाकरेंच्या मुलाच्या लग्नाची तारीखही होती 27 जानेवारी. 
  • महत्त्वाची वेळ म्हणजे लग्नाचा मुहूर्त होता 12 वाजून 51 मिनिटांचा
  • राज ठाकरेंकडे असलेल्या गाड्यांचे क्रमांक तपासून पाहा, सर्व गाड्यांचे क्रमांक 9 आहेत.

राजकीय क्षेत्रात वावरणारी मंडळी आकड्यांना फार महत्त्व देतात. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंसाठी निवडणुकीच्या दृष्टीनं जुळून आलेला योग कितीपत लकी ठरतो, हे निवडणुकीनंतर दिसून येईल.

Webtitle : marathi news raj thackeray MNS vidhansabha election and numerology 

संबंधित बातम्या

Saam TV Live