ईडीच्या चौकशीतच काय सात जन्म त्यांच्यासोबत :शर्मिला ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

मुंबई : मी राज ठाकरे यांची पत्नी आहे. त्यामुळे ईडीच्या चौकशीतच काय सात जन्म त्यांच्यासोबत आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दिली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे काही वेळापूर्वीच ईडी कार्यालयात कोहिनूर मिल जागेच्या प्रकरणात चौकशीसाठी हजर झाले असून त्यांची चौकशी संपेपर्यंत त्यांचे कुटुंबिय ईडी कार्यालयाजवळच असलेल्या 'ग्रँड' हॉटेलमध्ये थांबणार आहेत. मनसेचे काही वरिष्ठ नेतेही त्यांच्यासोबत याच हॉटेलमध्ये गेले आहेत.

राज ठाकरे सकाळी अकराच्या सुमारास कृष्णकुंज या आपल्या निवासस्थानाकडून ईडी कार्यालयाकडे रवाना झाले. त्यांची पत्नी शर्मिला, मुलगी उर्वशी, पुत्र अमित, सून मितालीही राज यांच्यासोबत होते. ईडी कार्यालयापासून काही अंतरावर सर्वांच्या गाड्या थांबवण्यात आल्या. त्यानंतर राज ईडी कार्यालयात गेले. त्यांचे कुटुंबिय बेलार्ड पिअर येथे ईडी कार्यालयापासून जवळच असलेल्या ग्रँड हॉटेलकडे रवाना झाले. 

राज यांचे पार्टनर उन्मेष जोशी यांची चौकशी आठ तासांहून अधिक काळ चालली होती. त्यामुळे राज यांच्या चौकशीलाही वेळ लागू शकतो. तेव्हा शर्मिला ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Web Title: Raj Thackeray s wife Sharmila Thacekray says that she is with Raj in every situation

संबंधित बातम्या

Saam TV Live