टँकर लॉबीचं पॉलिटिकल कनेक्शन तपासा; दुष्काळावरून राज ठाकरेंचा घणाघात

वैदेही काणेकर
सोमवार, 13 मे 2019

राज्याच्या विविध भागात दुष्काळामुळं भीषण परिस्थिती निर्माण झालीय. थेंबभर पाण्यासाठी राज्यातील जनतेला झगडावं लागतंय. बुलढाण्यासारख्या ठिकाणी बादलीभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. या दुष्काळाच्या काळात टँकर माफियांकडून जनतेची लूट सुरू आहे. या टँकर लॉबीचं पॉलिटिकल कनेक्शन तपासण्याची मागणी राज ठाकरेंनी केलीय. 

"सरकारनं काम केली मग दुष्काळाचा भीषण प्रश्न का निर्माण झाला? तुम्ही कोणत्या उपाययोजना केल्या" असा सवालच राज ठाकरेंनी उपस्थित केलाय. नेत्यांच्या दुष्काळ दौ-यावरही राज ठाकरेंनी टीकास्त्र सोडलंय. हा दौरा केवळ फार्स असल्याची टीका त्यांनी केलीय.

निवडणुकीच्या वेळी सरकारवर टीकास्त्र सोडणा-या राज ठाकरेंनी आता राज्यातील जनतेला भेडसावणा-या दुष्काळावरून आक्रमक पवित्रा घेतलाय. त्यामुळं दुष्काळप्रश्नी आता सरकारची कसोटी लागणार आहे.

Web Title : marathi news raj thackeray says check political connection of tankers owners and government
  
संबंधित बातम्या

Saam TV Live