Loksabha 2019 : सोलापुरात शरद पवार, राज आणि सुशीलकुमारांची भेट; चर्चांना उधाण

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 16 एप्रिल 2019

सोलापूर : भाजप-शिवसेना युतीविरोधात रणशिंग फुकणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सोलापुरात असताना ते मुक्कामास असलेल्या हॉटेलमध्येच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार वास्तव्यास होते. आज (मंगळवार) सकाळी राज, शरद पवार आणि सोलापुरातील काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांची भेट झाली.

राज ठाकरे यांनी सोमवारी रात्री सोलापुरात सभा घेत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी युती सरकारच्या मी लाभार्थी या जाहिरातीतील बेरोजगाराला समोर आणून पोलखोल केली. यावेळी त्यांनी भाजपला मदत करणाऱ्यांना मतदान करू नका, असेही आवाहन केले. राज यांच्या या सभेनंतर आघाडीला याचा फायदा होणार हे नक्की मानले जात आहे.

त्यानंतर आज सकाळी सोलापुरातील बालाजी सरोवर या हॉटेलमध्ये राज ठाकरे, शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांची भेट झाली. शरद पवार उस्मानाबाद येथे प्रचारासाठी जाणार आहेत. तर, राज ठाकरेंची इचलकरंजीत सभा आहे. यांच्या भेटीत नेमकी कशावर चर्चा झाली, याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र, राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Web Title: Raj Thackeray Sharad Pawar and Sushilkumar Shinde meets at Solapur

संबंधित बातम्या

Saam TV Live