विधानसभेच्या मोर्चेबांधणीसाठी राज ठाकरे उद्या कल्याण-डोंबिवलीत

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 6 मे 2019

डोंबिवली  : कल्याण लोकसभा मतदार संघात घडाळ्याला गती देण्यासाठी इंजिन पुढे सरसावले होते. आता लोकसभेच्या निवडणुका संपल्या असून विधानसभेची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. येत्या मंगळवारी ( ता, 7) रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे डोंबिवलीमध्ये येणार आहेत.

यावेळी ते चार विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा आणि केडीएमसी निवडणुकीत मनसेचे इंजिन पुन्हा रुळावर आणण्यासाठी मनसेने "राज"कीय डावपेच आखण्यासाठी आतापासूनच सुरवात केली आहे.

मनसेच्या दृष्टीने कल्याण आणि डोंबिवली ही दोन्ही शहरं अतिशय महत्वाची आहेत. 2009 साली कल्याण ग्रामीण आणि कल्याण पश्‍चिम विधानसभेच्या जागा मनसेने काबीज केल्या होत्या. तसेच 2010 च्या केडीएमसी निवडणुकीतही इंजिन सुसाट होते. डोंबिवली मध्ये भाजपाच्या प्रस्थापित अनेक जागांवर विजय मिळवत तब्बल 27 नगरसेवक निवडून आले होते. 

2014 साली मनसेला म्हणावे तसे यश मिळाले नाही .  मात्र, अनोखे आंदोलन , सामाजिक प्रश्नासाठी घेतलेला पुढाकार अशा माध्यमातून ठाणे जिल्हयात विशेषतः कल्याण डोंबिवलीत मनसे कायम क्रियाशील आणि चर्चेत राहिली आहे. या दोन्ही शहरांचे राजकीय महत्व दिवसेंदिवस वाढत असून या ठिकाणी पुन्हा आपला बोलबाला निर्माण करण्याचे मनसेचे मनसुबे आहेत.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मनसेने खुला पाठिंबा दिला होता. संवेदनशील आणि महत्वाचा मतदासंघ म्हणून कल्याण ग्रामीण विधानसभेकडे पाहिले आहे. लोकसभेत येथून राष्ट्रवादीला चांगली मते मिळाली तर या जागेसाठी त्यांच्याकडून दावा केला जाऊ शकतो. काहींनी आतापासून लॉबिंगला सुरवात केली आहे. अशा परिस्थितीत लोकसभेत " तुझ्या गळा माझ्या गळा " करणा-या इंजिन आणि घड्याळ्यामध्ये राजकीय फटाके फुटल्यास आश्‍चर्य वाटता कामा नये !

डोंबिवली शहर - भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या या मतदासंघातून संघ परिवार आणि ब्राहमण मतांचा प्रभाव आहे . मनसेचे नगरसेवक मंदार हळबे यांची येथे  तिकीतासाठी मोर्चेबांधणी सुरु आहे . 

कल्याण ग्रामीण - मोकळे भूखंड, बड्या बिल्डरांचे मोठे गृहप्रकल्प, होऊ घातलेले ग्रोथसेंटर यामुळे या परिसराला विशेष महत्व प्राप्त झाले आहे .  मनसेचे नेते राजू पाटील आणि त्यांचे बंधू विनोद पाटील यांनी  तिकीटासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे . 

कल्याण पश्‍चिम मधून  माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यासह कौस्तुभ देसाई ,नगरसेविका कस्तुरी देसाई ,उल्हास भोईर या पदाधिका-यांचीही नावे चर्चेत आहेत.

कल्याण पूर्व - या परिसरात मनसेची फारशी ताकद नसून पक्ष संघटनेचाही अभाव आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी या ठिकाणी नेमका कोणता निर्णय घेतात ते पाहावे लागेल.

संबंधित बातम्या

Saam TV Live