...म्हणून  राज ठाकरे  यांनी स्वत: उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद असले, तरी एका मुद्द्यावर मात्र ठाकरे बंधू एकत्र येताना दिसत आहेत.

निवडणुकीत ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेचा वापर करावा अशी मनसेची मागणी असून, याच मुद्द्यावर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. राज ठाकरे यांनी पत्रात मनसेच्या मागणीला शिवसेनेने पाठिंबा द्यावा असं आवाहन केलं आहे.  

ईव्हीएमवर बंदी आणूया, किंवा निवडणुकांवर बहिष्कार घालूया असं राज ठाकरेंनी पत्रात म्हटलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच ईव्हीएमच्या मुद्द्यावर बैठक बोलावली होती. या बैठकीला सर्व पक्षांचे प्रतिनिधी हजर होते. भाजपा वगळता जवळपास सर्वच पक्षांनी ईव्हीएम प्रक्रियेला विरोध केला असून, मतपत्रिकेद्वारे निवडणूक घेण्याची मागणी केली आहे.

त्यामुळे ईव्हीएमच्या मुद्द्यावर का होईना पण ठाकरे बंधू एकत्र आल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live