कशी असेल 'राज'पूत्राची राजकारणातील एन्ट्री? मनसे अधिवेशनात होणार लाँचींग...

कशी असेल 'राज'पूत्राची राजकारणातील एन्ट्री?  मनसे अधिवेशनात होणार लाँचींग...

मुंबई : अमित ठाकरे, राज ठाकरे यांचे सुपुत्र. अमित ठाकरे राजकारणात सक्रिय कधी होणार चाची सर्वत्र कायमच चर्चा होती. अशात आता अमित ठाकरे राजकारणात पूर्णपणे सक्रिय होणार याबात आता माहिती समोर येतेय. येत्या २३ तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पाहिलं वाहिलं महाअधिवेशन होणार आहे आणि या अधिवेशनातच अमित ठाकरे यांचं राजकीय लॉन्चिंग होणार असल्याचं समजतंय. 

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पडद्यामागे मोठ्या राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळतायत. अशात दोनच दिवसांआधी मनसे आपला झेंडा बदलणार असल्याचं समोर आलंय. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची परळ मधील रहिवासी इमारतीमध्ये भेट घेतलीये. त्यामुळे मनसेच्या गोटात मोठ्या हालचाली नक्की सुरु आहेत असं बोलाल्याला वाव आहे. या सर्व घडामोडी घडत असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अमित ठाकरे यांचं पोलिटिकल लॉन्चिंग करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येतेय. खरंतर अमित ठाकरे यांचा तरुण वर्गात एक मोठा चाहतावर्ग आहे. लोकांना अमित ठाकरे यांच्याबद्दल कायम एक अप्रूप आहे. ज्याचा फायदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला येत्या काळात होऊ शकतो.

मुंबईतील आरे कारशेडचा मुद्दा अमित ठाकरे यांनी लावून धरलेला. त्या आंदोलनात अमित यांचा सक्रिय सहभाग असल्याचं पाहायला मिळालं होतं. नवी मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी देखील अमित ठाकरे धावून आलेले पाहायला मिळाले होते. अमित ठाकरे यांनी थाळीनाद आंदोलन देखील केलं होतं. मात्र अमित ठाकरे यांनी मनसेच्या मोठ्या व्यासपीठावरून भाषण अद्याप केलेलं नाही. अशात येत्या काळात अमित ठाकरे मनसेमध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रियरित्या सहभागी झालेत तर मानसे पक्षाला आणि पक्षबांधणीला मोठा फायदा होऊ शकतो.

Web Title: political launching of amit thackeray will be next big step by raj thackeray and mns

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com