उत्तर प्रदेशच्या राजकारणातील प्रसिद्ध नेते  राजाभैय्यांनी घेतली  खासदार उदयनराजेंची भेट 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

उत्तर प्रदेशातील राजद नेते रघुराज प्रतापसिंह यांनी खासदार उदयनराजेंची सदिच्छा भेट घेतलीय.

रघुराज प्रतापसिंह उर्फ राजाभैय्या यांनी साता-यातील शासकीय विश्रामगृहावर खासदार उदयनराजेंची भेट घेतली असून त्यांच्यात बराच वेळ चर्चा झाली मात्र भेटीमागचं नेमकं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.

उत्तर प्रदेशच्या राजकारणातील प्रसिद्ध नेते म्हणून राजाभैय्या यांची ओळख आहे.

मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव यांच्या मंत्रिमंडळामध्ये राजाभैय्या मंत्री होते. दरम्यान या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live