राजस्थानात ४० हजारांच्या जमावाचा भाजप आमदाराच्या घरावर हल्लाबोल

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 3 एप्रिल 2018

राजस्थानात भाजपच्या दलित आमदाराचं घर जाळल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. ऍट्रॉसिटी कायद्यातील बदलाविरोधात राजस्थानमध्ये सलग दुस-या दिवशीही आंदोलन सुरूच आहे. करोली इथं भाजपच्या दोन दलित नेत्यांची घरं आंदोलकांनी जाळली आहेत. करोलीतील भाजपच्या दलित आमदार राजकुमारी जाटव यांचं घर आंदोलकांनी पेटवल्याचं समजतंय. या घटनेत तब्बल ४० हजारांचा जमावाने भाजप आमदाराच्या घरावर हल्लाबोल केल्याचं बोललं जातंय. याशिवाय करोलीतील भाजपच्या माजी आमदाराचंही घर जमावानं जाळलंय. त्याचबरोबर इथल्या शॉपिंग मॉलची तोडफोड केली. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live